राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतक-यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यात हा गुन्हा दाखल झालाय. सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केलाय.
या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल असा इशाराही मुश्रीफ समर्थकांनी दिलाय. भाजप नेते किरीट सोमय्या मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा कागलच्या काही शेतक-यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.