Friday, August 1, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी पाहिलीत का? MI कडून आज झाले अनावरण

मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी पाहिलीत का? MI कडून आज झाले अनावरण

पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधना ही सर्वाधिक ३.४० कोटी रक्कम घेणारी खेळाडू ठरली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे आणि आज मुंबई इंडियन्सने त्यांच्या जर्सीचे अनावरण केले.

महिला प्रीमिअर लीगमध्येमुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ – हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.

मुंबई इंडियन्स- मुख्य प्रशिक्षक – चार्लोट एडवर्ड्स, गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटॉर – झुलन गोस्वामी, फलंदाजी प्रशिक्षक – देविका पळशिकर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -