ताजी बातमी ऑनलाईन टीम
मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सनी उर्फ संतोष बागडे याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीन मंजूर केला. संशयित सनी उर्फ संतोष बागडे हा गेल्या पाचवर्षाहून अधिक काळ जेलमध्ये होता.
१६ जानेवारी २०१८ रोजी २२ टन सळी भरलेला ट्रक कागल ते रबकवी या मार्गावर जात असताना त्या ट्रकला मोटासायकलस्वार व चारचाकी स्वार यांनी बोरगांव रोडवर अडवून त्या ट्रकमधील २२ टन सळी घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी हुपरी पोलिसात सनी उर्फ संतोष बागडे यासह १० जणांना अटक करून त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
याप्रकरणात सनी बागडे याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणी दरम्यान बागडे यांचे अॅड. सुनिल कुलकर्णी यांनी घटनास्थळ तपासातील विसंगती, साक्षीदार तपास, घटनाक्रम तसेच मुद्देमाल, वाहनांचे वास्तव्य याबाबतच्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मांडलेला युक्तीवाद व उच्च न्यायालायाचे न्यानिवाडे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यालयालयाने त्यास जामीन मंजूर केला.
इचलकरंजी ; मोक्क्यातील संशयितास जामीन मंजूर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -