Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अज्ञाताने लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर, दुचाकी जळून खाक!

कोल्हापूर : अज्ञाताने लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर, दुचाकी जळून खाक!

अज्ञाताने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होवून रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी जळून खाक झाली.उत्तुर येथे गडहिंग्लज- गारगोटी रस्त्यावर ही घटना घडली.

गडहिंग्लज- गारगोटी रस्त्यावरील बेलेवाडी घाटात धामणे गावाच्या बाजूने अज्ञात इसमाने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर झाले. ही आग झपाट्याने पसरली. येथील नवकृष्णा व्हॅलीच्या चोहीकडे आग पसरत होती. अचानक पसरत असलेली आग पाहताच शाळेतील प्राचार्य रामकृष्ण मगदूम व शाळेतील सर्व शिक्षक एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी दुचाकीने आजऱ्याहून पिंपळगाव येथे नातेवाईकांकडे जाणाऱ्या गिरीश कुंभार हेही आग विझवण्यासाठी मदतीला धावले.

शाळेजवळील आग विझली परंतु काही वेळाने रस्त्याच्या कडेने आग पसरत गेली व कुंभार यांची रस्त्यावर उभी असलेली दुचाकी जळाली. वारेही जोरदार असल्याने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीच्या घटना उग्र स्वरूप धारण करत आहेत. याबाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -