Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरआदमापूरमधून सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण

आदमापूरमधून सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण

आदमापूर येथील बाळूमामा देवालय परिसरातून सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आयुष राहुल नाईकनवरे (वय 6, रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जिल्हा सातारा) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आयुष व त्याची आई सुषमा हे बाळूमामांच्या दर्शनासाठी आले होते. शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मंदिराशेजारील सभागृहातून एका अनोळखी 50 वर्षाच्या व्यक्तीने तसेच तीस वर्षाच्या महिलेने आयुषचे फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद आयुषची आई सुषमा नाईकनवरे यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी बाळूमामा देवालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून यामध्ये एका मोटारसायकलवरून बालकास घेऊन जाताना पुरुष व महिला दिसत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -