चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त खासदार धैर्यशील माने जात असताना त्यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ताफा अडवला. तसेच साहेब गद्दारी का केली? असा सवालही करत काळे झंडे दाखवले.उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून माने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. याचवेळी शिंदे गटाचे समर्थकही आल्याने दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीही झाली. यावरून हातकणंगलेमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या राहूल सावंत यांनी, पुन्हा असा भ्याड हल्ला झाला तर ओरिजनल शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ असा इशारा ठाकरे गटाला देण्यात आला. तर या सावंतला शिवसेना काय माहित आहे असा सवाल करत वेळ काळ आणि जागा सांगावी तेथे शिवसैनिक येतील मग कळेल कोण कोणाला भारी पडतो.
हातकणंगले मध्ये वातावरण तापलं; .तर ओरिजनल शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ, शिवसेनेचा इशारा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -