Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योजकांच्या नजरा

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योजकांच्या नजरा

महाराष्ट्र राज्य सरकारचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प
आज गुरुवारी मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग व्यवसायाला काय मिळेल, याकडे वस्त्रोद्योग व्यवसायातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. गेले अनेक वर्षे वस्त्रोद्योग आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा फटका वेळोवेळी मोठा फटका बसला आहे. अनेक यंत्रमाग भंगारात विकले गेले आहेत. तर वाढती कर्जे, सुतदरातील अस्थिरता, वीज दरवाढीचे वेळोवेळी येणारे संकट, कापसाच्या भावात होणारी चढ-उतार आदी कारणांमुळे हा व्यवसाय चालवणे अवघड झाले आहे. तर एप्रिल महिन्यापासून नवीन वीज दरवाढीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जवळपास दुप्पट दरवाढ होणार असल्याने वीज ग्राहकासोबतच यंत्रमागधारकही हवालदिल झाला आहे.

केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला कुठलाच भरीव निधी दिला नाही तर त्याला ठेंगाच दाखवला आहे. आता उरली सुरली आशा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना वस्त्रोद्योगाला नव संजीवनी देतील का? हे आजच्या अर्थसंकल्पानंतरच स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -