Saturday, February 8, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदे-फडणवीस सरकार 14 मार्चला कोसळेल -जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार 14 मार्चला कोसळेल -जयंत पाटील

“राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील नाही. कृषिमंत्री शेतकरी आत्महत्यांबाबत चुकीचं वक्तव्य करत आहेत, असा आरोप करत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. ते सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे जयंत केसरी बैलगाडा स्पर्धेदरम्यान माध्यमांशी बोलत होते.

“14 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी असून, आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. त्यावेळी सरकार पडेल की काय होते ते बघू, असं सांगताना शिंदे-फडणवीस सरकार 14 मार्चला कोसळेल”, असं विधान त्यांनी केलं.

“वास्तविक निधी कधीही थांबवला जात नाही, पण या सरकारने तेही करून दाखवले आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी अडवला जातो आणि केवळ सरकारला पाठिंबा देणाऱ्या 40 आमदारांना निधी दिला जात आहे”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

खासदार जलील हा एमआयएम पार्टीचा राजकारण करणारा माणूस असून त्याला आमच्या परीने आम्ही रोखठोक उत्तर देऊ. जलील हे करीत असलेल्या उपोषण साखळी आंदोलनात बिर्याणी पार्ट्या रंगत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त लोक क्रिमिनल आहेत अशांचा शोध घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आम्ही केली आहे.

खासदार जलील यांच्यामुळे जर उद्योजक जगतात अशांततेचे वातावरण निर्माण होत असेल तर उद्योजकांच्या आम्ही ठामपणे पाठिशी उभे आहोत अशी भूमिका आमदार सिरसाट यांनी मांडली.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाचं तिसऱ्या आठवड्यातील कामकाज आजपासून सुरू होईल. अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू होईल. अर्थसंकल्पात सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, त्यावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्याची चिन्ह आहेत. शेतमालाला भाव, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत यासह राज्यातील इतर मुद्द्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक होण्याची अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -