Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळ खल्लास! स्मृती मंधानाच्या नेतृत्वात नेमकं काय घडलं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळ खल्लास! स्मृती मंधानाच्या नेतृत्वात नेमकं काय घडलं?

वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. आयपीएल प्रमाणे डब्ल्युपीएलमध्ये बंगळुरूचं नाणं खोटं ठरताना दिसत आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात सलग पाच पराभव सहन करावे लागले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडळालाच आहे. आता स्पर्धेत फक्त तीन सामने उरले आहेत. आणि तिन्ही सामन्यात विजय मिळवला तरी गुणतालिकेत तितका फरक पडेल असं नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पदरी पहिल्याच स्पर्धेत निराशा पडली असं म्हणावं लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झाला. या सामन्यात दिल्लीने 5 गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र बंगळुरुचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 163 धावा करू शकला. दिल्लीने हा सामना 60 धावांनी जिंकला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध झाला. या सामन्यात बंगळुरुने सर्वबाद 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं. मुंबईने हे आव्हान 1 गडी गमवून 15 व्या षटकातच पूर्ण केलं. मुंबईने 9 गडी आणि 34 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा तिसरा सामना गुजरात जायन्ट्सशी झाला. या सामन्यात गुजरातनं 7 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं. बंगळुरुचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 190 धावा करू शकला. गुजरातचा 11 धावांनी विजय झाला.

चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध युपी वॉरियर्स यांच्यात झाला. बंगळुरु या सामन्यात सर्वबाद 138 धावा करु शकला. युपीने हे आव्हान 13 षटकात पूर्ण केलं. 10 गडी आणि 42 चेंडू राखून युपीने दणदणीत विजय मिळवला.

पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स पु्न्हा एकदा बंगळुरुला पराभवाची धूळ चारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 6 विकेट्स आणि 2 चेंडू राखून पूर्ण केलं.

सलग पाच पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ तळाशी आहे. त्यामुळे पहिल्या तीन संघात स्थान मिळवणं कठीण आहे. सर्वकाही जर तर वर अवलंबून आहे. तिसऱ्या संघासाठई युपी वॉरियर्स आणि गुजरात जायन्ट्स या संघाच्या कामगिरीवर अवलंबून असेल.पण शक्यता नाही अशीच आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे उरलेले सामने
15 मार्च UPW vs RCB संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
18 मार्च RCB vs GG संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
21 मार्च RCB vs MI दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -