Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरतुम्हाला एक, दीड लाख पगार, कशाला हवी पेन्शन, कोल्हापुरात बेरोजगारांनी काढला मोर्चा

तुम्हाला एक, दीड लाख पगार, कशाला हवी पेन्शन, कोल्हापुरात बेरोजगारांनी काढला मोर्चा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आम्हाला अर्ध्या पगारावर घ्या, आम्ही काम करायला तयार आहोत. शिक्षकांना एक, दीड लाख पगार… त्यांना पेन्शन कशाला?. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन द्या, अशी भूमिका घेत कोल्हापुरात सुशिक्षित बेरोजगारांनी आज (दि. १७) मोर्चा काढला. या मोर्चासाठी सुशिक्षित बेरोजगार दसरा चौकात जमले होते. या मोर्चाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन बाबतीत संपावर पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असतानाच आज शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांच्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाला ‘यायला लागतंय’ असा संदेश व्हायरल झाल्याने हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला. या व्हायरल मेसेजवर कोणाचे नाव अथवा मोबाईल नंबर नसल्यामुळे पोलिस मोर्चाच्या काढणाऱ्यांच्या मागावर आहेत. ‘जुनी पेन्शन रद्द करा, महाराष्ट्र वाचवा’, ‘आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला तेही पेन्शनविना…..’ असा उल्लेख असणारा आणि शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारा संदेश बुधवारपासून व्हायरल होत होता. आज या मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता दसरा चौकातून झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -