आज आपण जल्लोषात रामनवमी साजरी करत आहोत. देशभरात जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे वास्त्यव्य होते. तिथे तिथे आज काही अवशेष सापडतात. कोल्हापूरातही असा एक डोंगर आहे, जिथे श्री राम, माता सीता आणि लक्ष्मणजींनी वास्तव्य केलं होतं.तिथे श्री रामांनी घडवलेला एक चमत्कार आजही पहायला मिळतो.
भगवान शंकरांची महती असणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत. पण, महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे प्रभु श्री राम आणि भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एका ठिकाणी आहे.
कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्री राम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे.
१४ वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते. अशी माहिती पुराणात मिळते. आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत, गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर.
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक ऊन्हात ही अल्हाददायी, शांत असे वातावरण आहे.
श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात असताना याठिकाणी त्यांचे वास्तव होते.
काय आहे आख्यायिका
प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले. पण, पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशावेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरू आहे. हाच चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पहायला मिळतो.
वनवासात असताना रामचंद्र इथे आले, त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते.
इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिरांची अनुभूती देतो. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. येथे गेली शंभरहून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेले धुनी म्हणजेच अग्निकुंड आहे. मुख्य स्थान गुहेत आहे. गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र पाणी झिरपते.
गुहेच्या छताला मस्त लवणस्तंभ झालेले आहेत. बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासवं. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहे. वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत.
या भागातच धुळोबा, बाहुबली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामूळे पावसाळ्यात आणि श्रावणात इथे भाविकांची जास्त गर्दी असते. तिथे जाऊन दर्शन घेणाऱ्या फार लोकांना श्री रामांच्या वास्तव्याची कल्पना आहे.
कोल्हापुरातल्या या डोंगरात प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार आजही पहायला मिळतो!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -