रविवारी (दि.20) सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात गोल सर्कल मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे भव्य स्वागत करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून ही मूर्ती अगोदरच आणण्यात आली असून, दर्शनासाठी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करणाऱ्या या मंडळासाठी यंदाचे हे १२वे वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टँड येथील भव्य मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. आगमन सोहळ्यासाठी तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. मोबाईलमध्ये बाप्पाची छबी टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ दिसून आली. मात्र, या मिरवणुकीमुळे परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
गोल सर्कल मित्र मंडळाने पारंपरिक ढोल-ताशा पथकासह आकर्षक मिरवणुकीद्वारे गणेशमूर्तीचे स्वागत करत, गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करणारा सोहळा सादर केला.