Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगसलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकार मारहाण प्रकरण हायकोर्टाकडून रद्द

सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकार मारहाण प्रकरण हायकोर्टाकडून रद्द

अभिनेता सलमान खानला 2019 मधील प्रकरणात हायकोर्टानं दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत सलमानला या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. हे प्रकरण नेमकं काय होतं? ते जाणून घेऊयात…

सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकारानं त्याचं शूटिंग केलं. हे शूटिंग त्यानं युट्यूबवर अपलोड करण्यासाठी केले होते. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला आवडली नाही. त्यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं त्याला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टानं समन्स जारी करुन सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणी सलमाननं आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी झाली. कोर्टानं दोन्ही याचिकांचा स्विकार करत हे संपूर्ण प्रकरण कोर्टानं रद्द केलं आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली. हायकोर्टानं सलमान खानच्या विरोधातील हे संपूर्ण प्रकरण रद्द केलं आहे त्यामुळे आता सलमानला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

अभिनेता सलमान खान हा चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सलमान खानला काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला अटक केली. सलमानला याआधी देखील एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती.

सलमानचे लवकरच काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर-3’ हे चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहेत. तसेच तो किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -