Monday, July 28, 2025
Homeक्रीडाGT vs CSK : गुरु शिष्य आमने-सामने! नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार सामना

GT vs CSK : गुरु शिष्य आमने-सामने! नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार सामना


ज्या खेळाडूला गुरुस्थानी मानले त्याच्याविरुद्धच आजपासून गतविजेता हार्दिक पंड्या आयपीएलचे विजेतेपद राखण्याची मोहीम सुरू करणार आहे. गुजरात टायटस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
पदार्पणात विजेतेपद मिळवून हार्दिक पंड्याच्या गुजरात संघाने सर्वांना चकित केले. समतोल संघ ही त्यांची बाजू संपूर्ण स्पर्धेत उजवी ठरली होती. यंदाही जवळपास तोच संघ असल्यामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे; परंतु समोर चार विजेतेपद मिळवणारा, आणि भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी असल्यामुळे गुजरातसाठी सलामीची ही लढत सोपी असणार नाही.

‘इम्पॅक्ट खेळाडू’ हा नवा बदल यंदाच्या आयपीएलमध्ये असणार आहे. त्याचा उपयोग कसा आणि कधी करायचा याबाबत सर्व संघ अनभिज्ञ आहेत; परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही बदलांचा परिणामकारक वापर करण्यात धोनीचा हातखंडा आहे. त्यामुळे उद्याच्या सलामीच्या सामन्यात चौकार-षटकार आणि विकेट याचबरोबर इम्पॅक्ट खेळाडूच्या वापराची उत्सुकता सर्वांनाच असेल.

या खेळाडूंवर असणार लक्ष

• गुजरात : हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवटिया, रशिद खान.
चेन्नई: महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, मिशेल सँतनर.

एकमेकांविरुद्ध
सामने २ विजय : गुजरात : २ – चेन्नई : 0
सर्वाधिक धावा: गुजरात: १७० : चेन्नई : १६९
अखेरच्या तीन सामन्यांत : गुजरात: एक पराभव दोन विजय चेन्नई : तिन्ही सामन्यांत पराभव

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -