टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क आता आणखी एका व्यवसायात नशीब आजमावत आहेत. मस्क आणि वाद हे लोकप्रिय समीकरण आहे. बिनधास्त वक्तव्यासाठी मस्क ओळखल्या जातो. जगातील सर्वात श्रीमंत आहेत. त्यांनी नुकतेच ट्विटर ताब्यात घेतले आहे. सध्या मस्क यांची संपत्ती 187 दशलक्ष डॉलर आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. तर आता ते लोकांना झिंगाट करणार आहेत. मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअरआणली आहे. आलिशान कार, अंतराळ, सोशल मीडिया ते झिंगाटपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. ही बिअर भारतात कधी येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
Beer घालणार धुमाकूळ
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाने ही बिअर लाँच केली आहे. टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची झलक मद्यप्रेमींना खुणावत आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात 8,000 रुपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
टेस्लाच्या गीगाबिअरमध्ये 5 टक्के अल्कोहलची मात्रा आहे. या बिअरच्या पॅकमध्ये तीन बाटल्या आहेत. भारतीय चलनात या पॅकची किंमत 8,000 रुपये आहे. प्रत्येक बाटली 330 मिलिची आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी एलॉन मस्कने बिअर बाजारात पाऊल ठेवण्याची घोषणा केली होती. जर्मनीतील एका कार्यक्रमात त्याने मद्यप्रेमींसाठी खास बिअर आणण्याचे जाहीर केले होते.
सध्या या ठिकाणी विक्री
जर्मनीमध्ये टेस्ला गीगाबिअरची निर्मिती होत आहे. जर्मनीतील गीगाबिअरचे उत्पादन आता युरोपात पोहचत आहे. बेल्जिअम, चेक गणराज्य, डेनमार्क, जर्मनी, स्पेन, फ्रांस, आयर्लंड, इटली, लक्झिमबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये ही बिअर खरेदी करता येईल. भारतात ही बिअर कधी येईल, याची माहिती अद्याप समोर आली नाही.
टकीला शॉट
टेस्लाने यापूर्वी मद्य बाजारात टेस्ला टकीला आणले होते. हे त्यांचे पहिले अल्कोहॉलिक ड्रिंक होते. याची किंमत 2 डॉलर होती. ग्राहकांना दोन बाटल्या ऑर्डर करण्याची अनुमती होती. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही बिअर 150-200 रुपयांच्या दरम्यान मिळते.
सुंगधही वाटला
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी Burn Hair या नावाने परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या परफ्युची किंमत 100 डॉलर होती. या परफ्युमची खूप चर्चा झाली होती. टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत आहेत. त्यांनी नुकतेच ट्विटर ताब्यात घेतले आहे. सध्या मस्क यांची संपत्ती 187 दशलक्ष डॉलर आहे.