महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुर्ण झाली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने आपापली बाजू कोर्टसमोर मांडली आहे.त्यांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रतीज्ञापत्र देखील कोर्टासमोर सादर करण्यात आले आहेत. कोर्टाने सर्व बाजु ऐकुन घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल राखुन ठेवला आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे. या सर्वाोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू जेष्ठ वकील निरज किशन कौल आणि जेष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहे. तर ठाकरे गटाची बाजू जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल पुढील १० दिवसात येणार असल्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे राज्यमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची माहीती सूत्रांनी आहे. येत्या 10 दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबुन आहे. त्यानंतरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबधीचे वृत्त ‘साम’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचा फैसला १० दिवसात होणार?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -