Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगरितेश देशमुखचं पत्नी जिनिलियाशी भांडण? सर्वांसमोर म्हणायला लावलं ‘सॉरी’

रितेश देशमुखचं पत्नी जिनिलियाशी भांडण? सर्वांसमोर म्हणायला लावलं ‘सॉरी’

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे नुकतेच ‘वेड’ या चित्रपटात एकत्र झळकले. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रितेशसोबतची तिची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच या दोघांचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे त्यांच्यातील भांडणाची चर्चा होऊ लागली आहे. भांडण झाल्यानंतर रितेश आणि जिनिलिया त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत असतात. इतकंच नव्हे तर या व्हिडीओमध्ये जिनिलियाला सर्वांसमोर ‘सॉरी’ म्हणावं लागलं आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया वेगवेगळे बसलेले दिसत आहेत. भांडणानंतर हे दोघं एकमेकांवर नाराज आहेत. यामध्ये जिनिलिया म्हणते, “जे व्हायचं होतं ते झालं, आता काय करायचं आहे?” त्यानंतर रितेश तिला म्हणतो, ‘सॉरी बोल’. हे ऐकून जिनिलिया सर्वांसमोर म्हणते ‘अच्छा सॉरी’. जिनिलियाची ही माफी रितेशला आवडत नाही आणि तो तिला फक्त सॉर म्हणायला सांगतो. त्यानंतर जेव्हा जिनिलिया ‘सॉरी’ म्हणते तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो. रितेश आणि जिनिलिया नेहमीच इन्स्टाग्राम रिलद्वारे चाहत्यांना हसविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या व्हिडीओमागचा उद्देशसुद्धा हाच होता. यामध्ये पुन्हा एकदा दोघांची क्युट केमिस्ट्री पहायला मिळाली.

रितेश आणि जिनिलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जिनिलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016 मध्ये झाला आणि त्याचे नाव राहील असे ठेवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -