Sunday, August 10, 2025
Homeकोल्हापूरनववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक

नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक

सातारा शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित तरुणाने पीडित मुलीशी हे कृत्य केल्याचे
पोलिसांनी सांगितले.

संकेत मेंगणे (वय १९, मूळ रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीची आणि संकेत मेंगणे याची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संकेत हा पीडित मुलीला भेटण्यासाठी तिच्या शाळेजवळ आला. त्यावेळी त्याने तिचे फोटो काढले. त्यानंतर तो तेथून पुण्याला निघून गेला. पुन्हा तो १३ एप्रिलला साताऱ्यात आला. त्यावेळी त्याने त्या मुलीला तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तिला शहरातील एका हॉटेलमध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. अशा प्रकारे त्याने आणखी दोन ठिकाणी नेऊन दोनवेळा हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर तो तेथून पुण्याला निघून गेला.

या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर हा घडलेला प्रसंग तिच्या आईला सांगितला. आईने मुलीला विश्वासात घेऊन सारा प्रकार जाणून घेतल्यानंतर तातडीने शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. आपल्या मुलीवर बेतलेला प्रसंग आईने पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संकेत मेंगणेवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. हा प्रकार गंभीर असल्याने शाहूपुरी पोलिसांची एक टीम तातडीने पुण्याला रवाना झाली. शिक्रापूरमधून पोलिसांनी संकेतला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला आता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

संशयित संकेत मेंगणे याने पीडित मुलीवर शहरातील
तीन ठिकाणी बलात्कार केला. मुलीच्या शाळेशेजारील ठिकाण, कॅफे आणि हॉटेलचा त्यामध्ये समावशे आहे. मुलगी अल्पवयीन असताना संबंधित हॉटेल चालकाने
मुलीला लॉजमध्ये कसा प्रवेश दिला, असा प्रश्न
यानिमित्ताने उपस्थित होतोय. तसेच शहरातील अंधाऱ्या कोठडीतील कॅफेमध्येही गैरप्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -