आयपीएल 2023 मधील 25 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. आज (19 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर राजस्थान आणि लखनौ हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या हंगामातील ही लढत सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडणार आहे.
राजस्थान रॉयल्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुमारे चार वर्षांनंतर जयपूरच्या मैदानावर उतरणार आहे. बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर दुसर्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्स वर विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्स चा पराभव करुन पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सवाई मानसिंग स्टेडियमवरील हा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर फक्त एकच टी20 सामना खेळला गेला आहे. ही खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
लखनौ संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंह चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई.
राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ॲडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -








