Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : मजरेवाडी खूनप्रकरणी एकास अटक

कोल्हापूर : मजरेवाडी खूनप्रकरणी एकास अटक

मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील सावकर कल्लाप्पा देबाजे (वय 35) या मेंढपाळाच्या खून प्रकरणी माळाप्पा कय्याप्पा हेग्गण्णावर (वय 25, रा. नागराळे, ता. चिक्कोडी) याला पोलिसांनी 24 तासांत अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुरूंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली. पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या रागातून त्याने ठार केल्याची कबुली हेग्गण्णावर याने दिली.

मायाप्पा हेग्गण्णावर हा मांत्रिकाचे काम करतो. देबाजे याचे त्याच्या घरी वारंवार येणे-जाणे असल्याने त्याने मायाप्पा याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब मायाप्पाला समजताच त्याने त्याला ताकीद दिली होती. या रागातूनच मायाप्पाने तंत्रविद्या करण्याच्या बहाण्याने देबाजे याला बोलावून घेतले. लिंबू उतरून टाकण्यापूर्वी हात-पाय बांधावे लागतील, असे सांगून त्याने देबाजे याचे हात-पाय बांधले आणि कुर्‍हाडीने त्याच्या गळ्यावर वार केला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील, सहा. पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे आदींनी हा तपास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -