सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. चेपॉक मैदानावर सामना होणार आहे, येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते.. त्यामुळे आज फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो. बेन स्टोक्स तंदुरस्त झाला असून आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.. दुखापतीमुळे मागील तीन सामन्यासाठी स्टोक्स उपलब्ध नव्हता… बुधवारी स्टोक्सने सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज स्टोक्स उपलब्ध आहे. चेन्नईसाठी ही जमेची बाजू आहे. पण धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीची दमदार कामगिरी आणि शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचे आक्रमक रुप चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत. पण इतर फलंदाजांकडून योगदान मिळत नाही.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -