गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथे गणेश नामदेव संकपाळ (वय ४० रा. गणेश कॉलनी उचगाव) याचा निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
हल्लेखोरांनी त्याच्या पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर सिमेंट पाईपचा तुकडा डोक्यात घातला. पानपट्टीच्या उधारीवरून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रकरणाचाअवघ्या २४ तासांत छडापोलिसांनी सांगितले, की संकपाळ याने काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. तो, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तब्येत बिघडली आहे असे सांगून घरातुन बाहेर पडला. त्याने रात्री साडेदहाच्या सुमारास विकी जगदाळे याच्या पानटपरीतून सिगरेटचे पाकीट उधारीवर घेतले.तो पैसे देण्यासाठी आला नाही म्हणून विकीने मित्रासमवेत त्याचा शोध घेतला. या सर्वांना संकपाळ कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सापडला. उधारीच्या पैशावरून त्यांच्यात तेथे वादावादी झाली.
त्यातून धारदार शस्त्राने आणि सिमेंटच्या पाईपने खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Kolhapur Crime News: दोनशे रुपयांच्या उधारीसाठी एकाचा खून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -