राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस अन गारपीट अक्षरशः थैमान माजवत आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे, नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.एकंदरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यातून जे काही थोड्याफार प्रमाणात पीक वाचले ते या अवकाळी पावसाने हिरावून घेतले आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून नुकताच वर्तवण्यात आला आहे.
निश्चितच भारतीय हवामान विभागाचा हा जर अंदाज खरा ठरला तर या संबंधित विभागातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान या ठिकाणी होणार आहे. सामान्य नागरिकांना मात्र उकाड्यामधून दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस नासिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. याशिवाय मराठवाड्यातील म्हणजे औरंगाबाद विभागातील बीड, छ. संभाजीनगर , जालना या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात देखील पाऊस पडेल असं मत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आल आहे.
कोल्हापूर तसेच या जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -