Tuesday, April 23, 2024
Homenewsलहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस केव्हा येणार?..

लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस केव्हा येणार?..

या प्रश्नाच्या उत्तराची प्रत्येकजण वाट पाहत आहेत. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे भारतासह जगभरातील इतर देशांचंही खूप नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त केली जात आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांना चिंता होणं स्वाभाविक आहे. लहान मुलांसाठी काही लसींच्या चाचण्या सुरु आहेत. मात्र तरीही प्रश्न असा आहे की, लस कधी उपलब्ध होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांसाठी मार्च 2022 मध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. असे म्हटलं जातंय की, या वर्षी डिसेंबरपर्यंत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 3 ते 4 लसी मंजूर केल्या जाऊ शकतात.


कोणती लस कधी येण्याची शक्यता?
12 ते 18 वयोगटातील झायडस कॅडिलाची कोविड -19 लस ‘ZyCoV-D’ ऑगस्टच्या अखेरीस आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेकच्या लसीची चाचणी 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी सुरू आहे. या वयोगटासाठी ही जगातील एकमेव लस आहे. ही लस या वर्षी सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे.


सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाची नोवावॅक्स कोविड-19 (covid-19) लसीला डिसेंबरपर्यंत आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


Covovax लसीसंदर्भात अपडेट्स
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर कोव्होवॅक्स सीरम भारतात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लॉन्च होईल असं त्यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना म्हटलं होतं. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी येईल. 2022 च्या पहिल्या तिमाहीत 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही लस देखील लाँच केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -