सांगली, संजयनगर परिसरातील क्लासिक पार्क मध्ये असलेले बंद घर फोडून चोरटयांनी घरफोडी केली. घरच्या कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. या प्रकरणी हणमंत अण्णाप्पा बेरड (वय ७९, रा. मंगळवार बझार, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हणमंत बेरड हे निवृत्त असून ते आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील मंगळवार बझार( Bazar) येथे असणाऱ्या क्लासिक पार्क मधील घरात राहतात.Sangli News
बेरड हे कुटुंबियांसह कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेऊन घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप कडीकोयंडासह तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर( Lokar) तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. बेरड हे घरी परतले असता त्यांना घरच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले.Sangli News