सांगली, शहर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरट्यांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. आष्ट्याहून बसने सांगलीत आलेल्या महिलेच्या पर्स मधील दोन तोळे वजनाचे ६५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. सदर चोरीची घटना हि शनिवार दि. २० मे रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शालन सावंता माळी (रा. आष्टा) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. Sangli News
शालन माळी या आपल्या कुटुंबियांसह आष्टा येथील फडतरे मळा येथे राहतात. शनिवार दि. २० मे रोजी सायंकाळी त्या आष्टा ते सांगली( Sangli) या बसने शहर मध्यवर्ती बस स्थानकात सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आल्या. सुट्टीचे दिवस असल्याने बस मध्ये तसेच बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा उचलून अज्ञात चोरटयांनी माळी यांच्या बॅगेत ठेवलेले दोन तोळे वजनाचे आणि ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास करत पोबारा केला. काही वेळानंतर माळी यांनी बॅगेत ठेवलेले दागिने काढण्यासाठी गेल्या असता त्यांना सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घडलेल्या या प्रकारानंतर माळी यांनी सांगली शहर पोलीस ( Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Sangli News