Tuesday, July 29, 2025
HomeसांगलीSangli:करणी’च्या संशयातून मारहाण; मुलाचा मृत्यू

Sangli:करणी’च्या संशयातून मारहाण; मुलाचा मृत्यू

कर्नाटकातील(Karnatak) मांत्रिकाच्या मारहाणीत कवठेमहांकाळ (Kavtemahnkal)तालुक्यातील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उशिरा उघडकीस आला. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलाचे नातेवाईक लवकरच पोलिसांकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे कर्नाटकातील ‘त्या’ मांत्रिकावर कारवाई होणार का याची चर्चा सुरू आहे.याबाबतची नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, शाळकरी मुलगा काही दिवसांपासून आजारी होता. त्याला सतत ताप येत होता. तापात तो बडबडत असे. त्याच्या आईच्या चुलतीचे निधन झाल्याने त्या कर्नाटकातील चुलतीच्या गावी त्याला आई घेऊन गेली होती. तिथे गेल्यावर त्याला दम भरल्यासारखे होऊ लागले. त्यामुळे नातेवाईकांच्या सांगण्यावरून कर्नाटकातील एका मांत्रिकाकडे त्याला उपचारासाठी नेण्यात आले.

‘त्या’ मांत्रिकाने त्याच्यावर कुणीतरी करणी (Karni)केली असल्याचे सांगत बंद खोलीत नेऊन गोल रिंगण आखले. या रिंगणात मुलाला उभे केले. मांत्रिकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायांच्या मांडीचे कातडे निघाले होते. चेहर्‍यावर गंभीर दुखापत झाली. शरीरातील रक्त साखळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात मांत्रिकाने पलायन केल्याची चर्चा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -