Tuesday, April 23, 2024
Homenewsसुकन्या समृद्धी योजना : फक्त 8 ते 10 रुपये गुंतवणूक करून उज्ज्वल...

सुकन्या समृद्धी योजना : फक्त 8 ते 10 रुपये गुंतवणूक करून उज्ज्वल करा मुलीचं भविष्य


सर्वसामान्य जनतेसाठी खूशखबर आहे. तुम्ही मुलीचं शिक्षण (Daughters Education) आणि तिच्या लग्नाच्या (Daughters Marriage) खर्चावरून चिंतीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. फक्त दररोज 8 ते 10 रुपयांची बचत (Saving) करून तुम्ही मुलीचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. चिंतामुक्त होऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही एक सरकारी योजना आहे. कमी गुंतवणुकीत तुम्ही भविष्यात मोठी रक्कम मिळवू शकतात. तुम्हीच नाही तर तुमच्या प्रियजनांचं भविष्य देखील सुरक्षित करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत (Sukanya Samriddhi Yojana) पालक आपल्या कन्येच्या नावानं खाते उघडू शकतात. तुम्ही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 250 रुपये भरून खाते उघडू शकतात.

मिळतो चांगला व्याज दर
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) म्हणून ही योजना ओळखली जाते. ही एक छोटी बचत योजना असून ती केंद्र सरकार (Government Scheme) चालवते. तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षानंतर लग्न करेपर्यंत ही योजना सुरू ठेवता येते. या योजनेअंतर्गत कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खाते (Post office account) उघडू शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तुम्ही ही योजना सुरू ठेवू शकतात. परंतु तुम्हाला गुंतवणूक फक्त 14 वर्षांसाठी करायची आहे.

मुलीच्या शिक्षणासाठी काढू शकतात रक्कम
तुम्ही आपल्या मुलीच्या नावावर रोज एक रुपया बचत करून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या खात्यात तुम्ही एका आर्थिक वर्षात (Financial Year) कमीत कमी 250 रुपये जमा करणे महत्त्वाचे आहे. या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात. यामध्ये वयाच्या 18 वर्षांनंतर 50 टक्के पैसे तुम्ही काढू शकतात. हे पैसे तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी (Education) वापरु शकतात.

या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही मिळवू शकतात 15 लाख
या योजनेंतर्गत खाते उघडल्यानंतर जर तुम्ही दरमहा 3000 रुपये जमा केले तर वर्षभरात ही रक्कम 36,000 रुपये होईल. यावर तुम्हाला 7.6 टक्के दराने व्याज मिळेल. त्यानंतर ही रक्कम 9,11,574 रुपये होईल. अशाप्रकारे मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत संपूर्ण रक्कम 15,22,221 रुपये होईल. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज देय आहे.
बंद पडलेली योजना देखील सुरू करतात…
या योजनेत किमान 250 रुपये आर्थिक वर्षात जमा करावे लागतात. आपण खात्यात पैसे जमा करण्यास अक्षम असाल तर खाते बंद केले जाते. मात्र, पुन्हा खाते सुरू करण्यासाठी 50 रुपये दंड (Penalties) जमा करावा लागेल. त्यानंतर खाते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. खाते उघडल्यानंतर आपण असे 15 वर्षांपर्यंत करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -