Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगराज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट


मागील आठवड्यापासून सुरु असणाऱ्या पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील आसमंत झाकोळला आहे. ज्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन क्वचितच होताना दिसतंय. त्यातही हा पाऊस सध्यातरी काढता पाय घेण्याच्या किंवा उसंत घेण्याच्या तयारीत नसल्यामुळं हा नवा आठवडाही पावसाळी असणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हणजेच 27 ते 30 तारखेदरम्यान कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आयएमडीनं वर्तवला असून, पुढील 24 तासांच विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यातही सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती पाहायला मिळत असून, पुढील दोन दिवसांच्या कालावधीत इथं मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या दिवसांमध्ये ट्रेकिंग आणि वळणाच्या घाटरस्त्यांवर जाऊन हा थरार अनुभवण्याचा अनेकांचाच अट्टहास असतो. पण, अशा सर्वच उत्साही पर्यटकांना प्रशासनानं सतर्क करत घाटमाथ्यावर जाणं टाळावं असं आवाहन केलं आहे. तर, तिथे कोकणातही धबधबे आणि जलस्त्रोतांवर जाणं टाळावं असं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -