Monday, July 28, 2025
Homeक्रीडावर्ल्ड कपमधील भारत-पाक महामुकाबला रद्द?

वर्ल्ड कपमधील भारत-पाक महामुकाबला रद्द?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध फार ताणले गेलेले आहेत. मात्र त्यानंतरही दोन्ही देशांमधील किंबहुना क्रिकेट विश्वाला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा असते. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये क्रिकेट सामने खेळवण्यात येत नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धेत आणि आशिया कप स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे या दोन्हीच स्पर्धेच क्रिकेट चाहत्यांना काय तो हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवता येतो. आता आयसीसीने ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाही केलंय.

या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. वेळापत्रकानुसार या दोन्ही संघांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध पाक हा बहुप्रतिक्षित सामान सामना रद्द होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सामना रद्द होण्याचं कारण काय?
वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यंदा भारतात करण्यात आलंय. आता भारताचा आणि पाकिस्तानचा 36 चा आकडा आहे. पाकिस्तानने आधीच या वर्ल्ड कपमधील सामन्यांवरून हरकती घेतल्या आहेत. त्यानंतर अजूनही पाकिस्तान सरकारने क्रिकेट टीमला भारतात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिलेली नाही. अजूनही पाकिस्तान सरकारच्या एनओसीची प्रतिक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -