ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंढरपूरात आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी जमले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेचं पात्र भाविकांनी फुलून गेलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारक-यांनी गर्दी गर्दी केलीये.. कोणतीही अनुचीत घटना घडूनये यासाठी मंदिर परिसरात बॉम्ब शोध आणि निकामी पथक तैनात करण्यात आलं आहे.
आषाढी एकादशीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. आषाढी एकादशी निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाचं हे सगळे वारकरी दर्शन घेतील.
सोपान काका, तुकोबांची पालखी, तसंच एकनाथ महाराजांची पालखी आणि इतरही पालख्या पंढरीत पोहोचल्या आहेत.