Wednesday, December 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. तो त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबद्दल सातत्याने चर्चा होत होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, पण तीन वर्षे उलटूनही तपासात फार प्रगती झाली नव्हती. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी नवा खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “सुरुवातीला या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. उपलब्ध माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती, नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्याकडे खटल्याच्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले.”

पुढे ते म्हणाले, “सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपासत आहेत. ते पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारे नक्कीच कारवाई केली जाईल. मात्र सध्या मी या प्रकरणावर कोणतंही भाष्य करणं घाईचं ठरेल, योग्य वेळ आल्यावर मी त्यासंदर्भात बोलेन,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरा आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नवीन अपडेट दिली आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूप्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -