ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशीचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात वैष्णवांचा मेळावा जमतो. अठरा ते वीस दिवस पायी वारीत चालल्यानंतर विठुरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना असते. आज लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आज अनेक तरुण मंडळीही वारीत सहभागी होतात. तर, कलाकारांनाही विठुरायाच्या दर्शनाचा मोह आवरत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रवीण तरडे यांनीही विठ्ठलाच्या भेटीचा खास अनुभव शेअर केला आहे.
प्रवीण तरडे यांची फेसबुक पोस्ट
अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आई-वडिलांना विठ्ठलाचे दर्शन घडवले आहे. त्यासोबतच फेसबुकवर एक अनुभवदेखील मांडला आहे. काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो, म्हणाल त्या देशात ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल. मी म्हणालो पंढरपूर? का? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून पाहिलं नाही, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा. आता जरा निरखून पहायचाय, असं त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले आहे.
शूटिंग थांबवून प्रवीण तरडेने आई-वडिलांना घडवलं विठ्ठल दर्शन; म्हणाला, विठ्ठलाकडे पाहताच…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -