Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगसोलापुरात Love Pakistan लिहिलेल्या फुग्यांची विक्री, मुस्लिम , पुढे काय झाले पहा..

सोलापुरात Love Pakistan लिहिलेल्या फुग्यांची विक्री, मुस्लिम , पुढे काय झाले पहा..

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. याच दिवशी सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापुरात ईदगाह मैदानजवळ पाकिस्ताचा झेंडा आणि LOVE PAKISTAN लिहलेले फुगे विकले जात होते. बकरी ईद निमित्त नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाच्या लक्षात येताच फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे फुगे कुठून आणले यासंदर्भात चौकशी सुरु आहे. ईदच्या दिवशी पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवणारे फुगे विक्रीसाठी आणून काहीजणं समाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे फुगे बाजारात कसे आले, कुणी तयार केले आणि होलसेल विक्री ज्यांनी केली या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएम वाहतुक आघाडीचे शहाराध्यक्ष रियाज सय्यद यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येत असतात. यावेळी एक फुगेवाला लव्ह पाकिस्तान असे छापलेले फुगे विकत असल्याचं काही जणांच्या लक्षात आलं. मुस्लीम बांधवांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देत त्या फुगेवाल्याला पकडून दिलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -