ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी : बकरी ईद आणि आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर शहरातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित रहावी यासाठी रेकॉर्डवरील तब्बल ५९ जणांवर ३ दिवसांसाठी तालुका हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अप्पर तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी जारी केले आहेत.
इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील २९ जणांचा तर शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील ५ तर शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील २५ जणांचा समावेश आहे. २७ जुन ते ३० जुन अखेर हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) नुसार सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे प्रस्ताव इचलकरंजी, शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्याकडून पाठवण्यात आले होते.
इचलकरंजी ; ५९ जणांवर हद्दपारीची कारवाई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -