Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीराजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद

राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद

यावर्षी पहिल्यांदाच राजापूर बंधारा पाण्याखाली गेला असुन धरणावरून होणारी वाहतूक पूर्णपणे  बंद केली आहे. कृष्णा नदीवरील महाराष्ट्र हद्दीतील शेवटचा कर्नाटकात
राजापूर बंधारा रविवारी जाण्याचा मार्ग बंद दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरुन कर्नाटकात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा धरणक्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वारणा नद्यांच्या पात्रांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने तालुक्यातील यापूर्वी सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पातळी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावरुन वाहत आहे. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्याला तटलेली जलपर्णी वाहत शिरढोण पुलाला तटली आहे. शिरोळ तालुका पावसाअभावी कोरडा असला तरी पंचगंगा व कष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळीत वाढ होत आहे.

पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा शनिवारीच पाण्याखाली गेले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर बंधारा रविवारी दुपारी पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरुन मंगावती, जुगुळ या कर्नाटकातील गावांत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास वाहतुक पूर्ववत सुरू होईल. मात्र सध्या पाणीपातळी वाढल्याने मार्ग बंद केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -