Friday, October 18, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मार्गी, हातकणंगले - इचलकरंजीचे काय?

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मार्गी, हातकणंगले – इचलकरंजीचे काय?

कोल्हापूर-वैभववाडी या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गासाठी कोकण रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यामुळे कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी हा रेल्वे मार्ग उपयुक्त असणार आहे. मात्र हातकणंगले – इचलकरंजी नऊ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काय? असा प्रश्न इचलकरंजी शहर परिसराचे नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर-वैभववाडी आणि हातकणंगले – इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण या दोन्ही रेल्वे •मार्गाला एकाचवेळी मंजुरी देण्यात आली व दोन्ही मार्गाचे भूमिपूजनही एकाचवेळी करण्यात आले होते.” दोन्ही रेल्वे मार्गाचे २०१७ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर या दोन्ही रेल्वे मार्गाचा सव्हें मध्य रेल्वे पुणे यांच्याकडून पूर्ण करून त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दळणवळणासाठी हे दोन्हीही रेल्वे मार्ग अत्यंत उपयुक्त आणि योग्य असल्यामुळेच या दोन्ही मार्गाला मंजुरी मिळाली पण हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्गाचे काम खोळंबले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची या प्रकरणात उदासिनताच दिसून येत आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे कोल्हापूर- वैभववाडी या रेल्वे मार्गाला गती मिळत असल्याचे
दिसून आले आहे. देशामध्ये कोल्हापूर जिल्हा उद्योग, पर्यटन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बाबींमध्ये अग्रेसर आहे अशा या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये इचलकरंजी शहराचे महत्त्व तितकेच आहे. इचलकरंजी शहर हे कापड उद्योगांमध्ये अग्रेसर असून रोजगार देण्यामध्ये अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये इचलकरंजी शहराची प्रमुख भूमिका आहे.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी इचलकरंजीतील उद्योग धंद्यांचा विकास व्हावा आणि हे शहर रेल्वे मार्गाने जोडले जावे हा दृष्टिकोन ठेवून हातकणंगले इचलकरंजी नऊ किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. सदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी प्रयत्न केले.

याचबरोबर रेल्वे कृती समिती गेल्या बारा वर्षापासून प्रयत्नशील आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इचलकरंजीच्या समस्त नागरिकांनी या रेल्वे मार्गांसाठी मोठे प्रयत्न केले. वेळोवेळी प्रधानमंत्री, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत पत्रे पाठवली आहेत. ही एक विशेष उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण बाब आहे. इतिहासामध्ये याची नोंद होईल यात शंका नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या शहराने मोठा हातभार दिला, अशा या शहराला रेल्वे मार्गाची अत्यंत आवश्यकता आहे. फक्त कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाचा विचार न होता यासोबत हातकणंगले हजारो कोटी महसूल दरवर्षी जमा करते अशा शहराला रेल्वे मार्गांसाठी १८० कोटीची आवश्यकता असताना त्याच्याकडे दुर्लक्षित करणे योग्य आहे का? याचा विचार शासनाने गांभीर्याने करावा. इचलकरंजी नऊ किलोमीटर रेल्वे मार्गासंबंधी पण विचार होणे आवश्यक आहे अन्यथा दुजाभाव केला जात आहे, असे चित्र निर्माण होईल.

महाराष्ट्रातील अनेक रेल्वेमार्ग नव्याने अस्तित्वात येण्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला जात असताना जे शहर राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत खासदारांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न केले आहेत तसेच प्रयत्न आपण सर्वांनी एकत्रितपणे हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्गासाठीही पूर्ण ताकतीने इचलकरंजी वस्त्रनगरीला रेल्वे मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी इचलकरंजी शहरवासीयांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -