ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री सनी लिओन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सनी चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचं सनीचं कारण जरा वेगळं आहे. कारण हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही बोल्ड अभिनेत्री आता साऊथ सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच सनीचा एक नवाकोरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सनीने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या आगामी सिनेमाचं टीझर शेअर केला आहे.
2023 च्या मे मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी या प्रतिभावान चित्रपटात दमदार पदार्पण केल्यानंतर आता सनी एका नव्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. ” चार्लीच्या ” भूमिकेसाठी तिला अनोखं प्रेम मिळालं आणि आता सनी पुन्हा एकदम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. केनेडी ने जगभरातील प्रेक्षकांनी मन जिंकली आणि आता सनी नवा कोरा चित्रपट करण्यासाठी सज्ज झाली असून ” कोटेशन गँग ” या तमिळ चित्रपटात ती दिसणार असल्याची घोषणा तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझरसह तिने ही खास गोष्ट तिच्या फॅन्स सोबत शेअर केली आहे.
अभिनेत्री सनी लिओन आता गाजवणार साऊथ इंडस्ट्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -