Sunday, December 22, 2024
Homenews300 फूट टॉवरवर चडून तिघांचे शोले स्टाईल आंदोलन....

300 फूट टॉवरवर चडून तिघांचे शोले स्टाईल आंदोलन….

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या 300 फूट टॉवरवर आज तीन आंदोलनकर्त्यांनी चढत वीरूगिरी करुन शोले स्टाईल आंदोलन केलेले आहे. मिल कामगारांच्या मागण्या पूर्ण करा, त्यांचे पगार काढा यासाठी तीन जण सकाळीच फिनले(finle) मिलच्या टॉवरवर चढल्याने पोलिसांचे व प्रशासनामधे मोठी धांदल उडाली आहे.


अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात असणारे एनटीसी भारत सरकारमार्फत चालवण्यात येणारी फिनले मिल सध्या 18 महिन्यांपासून बंद असल्यामुळे कामगारांची दयनीय अवस्था झालेली आहे. यासाठी बरेचदा शासनाला निवेदन सुद्धा देण्यात आली तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनसुद्धा करण्यात आली होती. तरीसुद्धा मिल सुरू झालेली नाही व आता येथील कामगारांना कामावार रुजू सुद्धा करून घेतलेले नाही.

त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे, त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मिलमधील 90 टक्के कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे. सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. तर असेच सुरू राहिल्यास भविष्यात अनेक कामगार आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या सर्व बाबींवर गिरणी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी निवेदने दिली. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मिल सुरू झालेली नसल्याने आम्ही आता जीवघेणे आंदोलन करत आहोत.

कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ याची सर्वस्वी जबाबदारी एनटीसी प्रशासनाची राहील. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही या टॉवरवरच बसू इथेच उपोषण करू असा इशारा टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी दिलेला आहे. अभय माथने, धर्मा राऊत व आणखी एक अशी टॉवरवर चढलेल्या तिघा आदोलकांची नावे असल्याचे समजत आहे. तिन्ही आंदोलकांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच बसवू अशी भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -