हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेसाठी येथील शिवतीर्थ इचलकरंजी बस स्थानक तयारी करत असून लोकप्रतिनिधींच्या फंडासह लोक सहभागातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती आगार प्रमुख सागर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक हे राज्यभर राबविले जात आहे. यासाठी तीन गट असून इचलकरंजी अ वर्ग गटातून तयारी करत आहे. प्राथमिक स्तरावरील तपासणी मध्ये इचलकरंजी ला ६२ गुण प्राप्त झाले आहेत. यात प्रथम क्रमांक मिळाल्यास ५० लाख रुपयांची बक्षीस मिळणार आहे. स्वच्छ बस स्थानका अंतर्गत इमारतीची रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याचे पाणी, टॉयलेटची सुविधा, प्रवासी वर्गासाठी व चांगल्या एसटी गाड्या त्या बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे. इचलकरंजी एस.टी. आगारात वीस खाजगी बस गाड्या सह ८२ एसटी बसेस आहेत. १६९ वाहक आणि १५५ चालक इतका कर्मचारी वर्ग आहे. दररोज २९ हजार किलोमीटरचा प्रवास या आगारातून होतो. तर दररोजचे सरासरी उत्पन्न दहा लाख रुपये आहे. यात महिला प्रवाशी प्रमाण जादा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगाराचे उत्पन्न सर्वात जास्त आहे असा दावाही त्यांनी केला.
इचलकरंजी एसटी आगार हायटेक बनवण्यासाठी आम. प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून ५ कोटी ७३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एस टी स्थानक पूर्ण परिसर डाबरीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, शौचालय मुतारी सुविधा अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे. तंबाखू, गुटखा या पासून कर्मचारी वर्ग दूर राहील याकडे लक्ष्य देणे आदी कामा ना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच विना अपघात बस चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो. अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक सुहास चव्हाण उपस्थित होते.