इचलकरंजी, येथील गांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश भागवत गरड (वय ३१ रा. तारदाळ) आणि शुभम राजेश वायचळ (वय २५ रा. शहापूर) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून २ किलो गांजा आणि दुचाकी असा ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, गांजा विक्री आणि खरेदीसाठी शहापूर परिसरातील कारंडे मळा स्मशानभूमीजवळ दोघेजण येणार असल्याची माहिती शहापूर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी भागात सापळा रचण्यात आला. त्यावेळी अंकुश गरड हा बेकादेशीरपणे गांजा आणून तो शुभम वायचळ याला विकत असताना मिळून आला.
पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १.९०० किलोचा ३८ हजार रुपयांचा गांजा, १ हजार रुपये रोख आणि २० हजाराची दुचाकी असा ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई शहापूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक माळी, अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, अर्जुन फातले, संतोष कांबळे, रविंद्र महाजन, शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली.