भारताच्या इस्त्रोने चांद्रयान- ३ ने चंद्रावर यशस्वी लँडींग केल्यानंतर देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये इचलकरंजी शहरात सुध्दा विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. शहरात विविध भागात फटाक्यांची आतषबाजी करून साखर वाटप करण्यात आले. तसेच भारत माता की जयचा जयघोष करत वैज्ञानिकांचे व देशवासीयांचे अभिनंदन करण्यात आले.
चांद्रयान ३ ने भरारी घेतल्या पासूनच त्याच्या लँडिंगबाबत उत्सुक्ता सर्वांना लागून राहिली होती. चंद्रावर यशस्वी लँडिंग होण्यासाठी देशभरातून नागरिक प्रार्थना करीत होते. भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात फटाक्यांची आतषबाजी करत साखरपेढे वाटप करण्यात आले. यावेळी उमाकांत दाभोळे, पैलवान अमृत भोसले, पांडुरंग म्हातुकडे, दीपक रावळ, अरविंद शर्मा, विनोद काकांणी, प्रदीप मळगे, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, बाळकृष्ण तोतला, राजेंद्र बोहरा, राजू भाकरे, पूनम जाधव, कोंडीबा दवडते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने शिवतीर्थ येथे साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.