बुध्दीचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होत आहे. श्री. गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. तर कुंभारवाडे व कारागिरमंडळी रात्रीचा दिवस करून मूर्ती तयार करण्याच्या कामात मग्न आहेत. आगमनासाठी दोन-तीन आठवडे शिल्लक राहिल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह विविध ठिकाणी गणरायाचे स्टॉल उभारू लागले असून नागरिक हळू-हळू गर्दी करू लागले आहेत.
राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून मूर्ती शहर परिसरात पेण, बेळगांव, कराड, उंब्रज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणासह अन्य भागातून सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात येत असून ठिकठिकाणी स्टॉल उभारले जात आहे.
सर्वांच्याच मनावर अधिराज्य करणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थी जस-जशी जवळ येवू लागली आहे. तशी कुंभारवाड्यातील लगबग वाढत चालली आहे. कारागिरमंडळी विविध रूपातील आकर्षक मूर्ती सध्या अनेक ठिकाणी मूर्तीचे स्टॉल उभारण्यात आले आहे. त्यामध्ये श्री. विठ्ठल बाळूमामा साईबाबा श्री स्वामी समर्थ, जय मल्हार, जोतिबा आदी देवांच्या रूपासह छ. शिवाजी महाराज तसेच इतर आकर्षक रुपात अनेक मूर्ती दिसून येत आहे.
गणेशमूर्ती तयार करण्याबरोबर रंगकाम करताना दंग आहे. तर अनेक कारागीरमंडळी तयार झालेल्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी बाहेर परगावी पाठवत आहेत. विविध सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा कशा
पध्दतीने करायचा याच्या तयारीला लागले आहेत. सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तीच्या सजावटीच्या साहित्याचे स्टॉल उभारू लागले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे प्रभावळी, आरास, कापडी पडदे, आकर्षक लायटींगच्या माळा आदींच्या स्टॉलवर गर्दी होताना दिसून येत आहे.