Friday, June 21, 2024
Homeब्रेकिंगसणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला

सणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला

महागाईने (Inflation) जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नागरिकांना हैराण केले. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न सुरु केले आहे. निर्यात बंदी, आयात शुल्क अशा उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. यापूर्वी काही डाळींनी केंद्र सरकारचे डोकेदुखी वाढवली होती. पण आता जवळपास सगळ्याच डाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ महागाईने दोन महिन्यात सर्वसामान्यांना आणि केंद्र सरकारला (Central Government) जेरीस आणले होते. आता डाळीचे दर (Pulses Rate Hike) अजून गगनाला भिडलेले आहेत. या दोन महिन्यांपासून डाळीच्या किंमतीत इतक्या टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यांपासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. डाळीच्या दरवाढीला आताच लगाम घातला नाही तर सणाच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ शकते. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला डाळींनी आव्हान दिले आहे.

ग्राहक विभागाच्या आकड्यानुसार, 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत हरबरा डाळीचा भाव 72 रुपये होता. 1 सप्टेंबर रोजी ही डाळ 82 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर दिल्लीत तूरडाळीचा भाव 148 रुपये किलोहून 162 रुपये किलोवर पहोचली. या दरम्यान उडदाच्या डाळीचा भाव 5 रुपयांनी वाढून 132 रुपयांवर पोहचला. मसूर डाळ भाव 4 रुपये प्रति किलोने वाढून 91 रुपये झाली. डाळींचा भाव 14 टक्क्यांनी वाढला.

महागाईने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड ब्रेक केला. 30 ते 40 रुपये किलो टोमॅटोचा भाव थेट 300 ते 350 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला. हा दर 7.44 टक्क्यांवर गेला. किरकोळ महागाईने या महिन्यात कळस गाठला होता.


त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई 37.34 टक्के होती. डाळींचा महागाई दर 13.27 टक्के होता. ऑगस्ट महिन्यात डाळींच्या किंमतीत जोरदार तेजी आली.

इकडे खरीप धोक्यात आला आहे. डाळींसाठीची प्रमुख उत्पादक राज्यांना पावसाने ओढ दिल्याने फटका बसला आहे. यावेळी खरीपातील डाळींचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबरपासून देशातील खरीपाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 11 लाख हेक्टरने कमी होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकूण शेती 119.09 लाख हेक्टर नोंदविण्यात आली आहे. यामध्ये तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा घटण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -