Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीक्रिप्टो करन्सी गुंतवणूक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती साडेचार कोटींवर

क्रिप्टो करन्सी गुंतवणूक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती साडेचार कोटींवर

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीतून दुप्पट रक्कम मिळवून देण्याच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे या प्रकरणी २७ जणांनी आज अखेर तक्रारी अर्ज केले असून फसवणुकीचा आकडा तब्बल ४ कोटी ८५ लाख ४२ हजार रूपयांवर पोहोचला आहे अशी माहिती तसेच अन्य चार संशयीतांच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूकीतून दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवुन रेंदाळ येथील पंढरीनाथ महाजन आणि त्यांच्या ६ मित्रांची एकूण ३७ लाख ३१ हजार रुपये गुंतवले होते. मात्र अडीच वर्षात काहीच परतावा न मिळाल्याने त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात ८ जणांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील व्यंकटेश भोई, चेतन मोहिरे, अजय गायकवाड आणि निखिल रेपाळ या चौघांना पोलिसांनी अटक केले होते त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. चौघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर उर्वरीत ४ संशयीतांचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -