Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगइस्रोची नवी अपडेट! चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र केले जारी, सोशल मीडियावर व्हायरल

इस्रोची नवी अपडेट! चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र केले जारी, सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने एका खास तंत्राद्वारे काढलेलं 3D ‘अ‍ॅनाग्लिफ’ चित्र प्रसिद्ध केले आहे. इस्रोने मंगळवारी आपल्या ट्विटर हँडलवर चंद्राच्या पृष्ठभागाचे 3D छायाचित्र शेअर केले. प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने ‘अ‍ॅनाग्लिफ’ तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्र काढण्यात आले आहे. हे छायाचित्र Anaglyph NavCam स्टिरीओ वापरून तयार केले आहे, ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हरकडून घेण्यात आलेल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या अशा दोन्ही प्रतिमांचा समावेश आहे.

चांद्रयान-३’ मोहिमेदरम्यान, प्रज्ञान रोव्हरद्वारे चंद्राचा पृष्ठभाग थ्रीडी इफेक्टमध्ये पाहण्यासाठी खास ‘अ‍ॅनाग्लिफ’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला. इस्रोने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक छायाचित्र प्रसिद्ध करून ही माहिती दिली. या छायाचित्रात चंद्राचा पृष्ठभाग आणि विक्रम लँडर दिसत आहेत. इस्रोच्या इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टम्स (LEOS) प्रयोगशाळेकडून विकसित करण्यात आलेल्या NavCam नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रोव्हरने ही अॅनाग्लिफ प्रतिमा तयार केली आहे. NavCam हे LEOS/ISRO ने विकसित केले आहे. डेटा प्रोसेसिंग SAC/ISRO द्वारे केले जाते.

ISRO ने म्हटले आहे की, प्रज्ञान रोव्हरने कॅप्चर केलेल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही प्रतिमांसह नवकॅम स्टिरिओ प्रतिमांचा वापर करून हे अॅनाग्लिफ तयार करण्यात आले आहे.”इस्रोने सांगितले की, या 3D छायाचित्रात, डावीकडील प्रतिमा ही लाल चॅनेलमध्ये आहे, तर उजवी प्रतिमा निळ्या आणि हिरव्या चॅनेलमध्ये आहे. या दोन्ही प्रतिमांमधील दृष्टीकोनातील फरकाचा परिणाम स्टिरीओ इफेक्टमध्ये होतो, जो 3D व्हिज्युअल प्रभाव देतो. हे छायाचित्र 3D पाहण्यासाठी एक विशेष चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जातो.

थ्रीडी चष्म्यातून हे चित्र पाहिल्यास हे चित्र आणखी सुंदर दिसेल, अशी माहितीही इस्रोने दिली आहे. हे दृश्य पाहताना तुम्ही चंद्रावर उभे असल्याचा भास होईल. ISRO ने स्पष्ट केले की, अ‍ॅनाग्लिफ हे स्टिरिओ किंवा मल्टी व्ह्यू प्रतिमांमधून निर्माण झालेले 3D दृश्य आहे.


इस्रोने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या ट्विटर हँडलवर हे छायाचित्र शेअर केले. आतापर्यंत जवळपास 1.1 लाख लोकांनी हा फोटो पाहिला आहे आणि सुमारे 37 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा दुर्मिळ फोटो पाहिल्यानंतर लोकांनी इस्रोचे खूप कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, इस्रो ही भारताची शान आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा सीन अप्रतिम आहे.

यापूर्वी, विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या ‘होप’ चाचणी केली होती, ज्याचे वर्णन इस्रोने पुन्हा यशस्वी ‘सॉफ्ट-लँडिंग’ म्हणून केले. इस्रोने सोमवारी (४ सप्टेंबर) सांगितले की, चांद्रयानचे पेलोड आता निष्क्रिय झाले आहेत. तसेच इस्रोने सांगितले की, यशस्वी ‘होप’ चाचणीमुळे विक्रम लँडर पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले, तसेच ही चाचणी शास्त्रज्ञांना भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मदत करेल, या माध्यमातून हे नमुने पृथ्वीवर पाठवले जाऊ शकतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशाप्रकारच्या मोहिमांमध्ये मानवांना मदतही होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -