हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे.
अशी मान्यता आहे की, यंदा श्रीकृष्णाची 5251 वी जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, यंदा जन्माष्टमी दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यावर्षी जन्माष्टमीचा सण बुधवारी 6 सप्टेंबर 2023 ला ( (Janmashtami 2023 Date)) साजरा करण्यात येणार आहे. चंद्राचे आवडते नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र हे सकाळी 9:20 पासून सुरु होणार असून 7 सप्टेंबरला सकाळी 10.25 वाजेपर्यंत असेल. तर पंचांगानुसार अष्टमी तिथी ही 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबरला (janmashtami holiday) दुपारी 4:14 वाजेपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्र पिंपळकर म्हणतात गृहस्थ 6 सप्टेंबरला जन्माष्टमी आणि 7 सप्टेंबरला वैष्णव संप्रदायात कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करणार आहेत.
जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त
6 सप्टेंबर 2023 – रात्री 12.02 ते 12.48 वाजेपर्यंत असणार आहे.
पूजा मुहूर्त
श्री कृष्ण पूजेची वेळ – 6 सप्टेंबर 2023, रात्री 12.00 ते 12:48 वाजेपर्यंत
पूजेचा कालावधी – 48 मिनिटं
जन्माष्टमीला अशी करा पूजा
सप्तमीच्या दिवशी फक्त हलके आणि सात्विक अन्न ग्रहण करावे. व्रताच्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर 2023 सकाळी स्नान करून सर्व देवतांची आराधना करावी. त्यानंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड बसा. आता हातात पाणी, फळं, फुलं घेऊन उपवासाचं व्रत करा. भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकी यांची मूर्ती किंवा सुंदर चित्र स्थापन करा. देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी यांची नावं घेऊन पूजा करा. मध्यरात्री 12 नंतरच हे व्रत पाळलं जातं. या व्रतामध्ये धान्य वापरले जात नाही.
6 सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -