Saturday, July 27, 2024
Homenewsफक्त RTO नाही तर या संस्थांकडूनही यापुढे तुम्हाला मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स!

फक्त RTO नाही तर या संस्थांकडूनही यापुढे तुम्हाला मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स!



ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) म्हटलं की आरटीओ (RTO) आलेच. ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही आरटीओ कार्यालयात (RTO Office) गेला असाल. बऱ्याचदा सतत फेऱ्या मारुन देखील तुमचे ड्राईव्हिंग लायसन्सचे काम होत नाही. कधी कधी एजंटला देखील पैसे देऊन कामं करुन घ्यावी लागतात. यापुढे तुमचे हे सर्व टेन्शन दूर होणार आहे. यापुढे सहजासहजी आणि आरटीओची गरज न लागता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकणार आहात.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and State Highways) महिनाभरापूर्वी एक नोटीस काढली आहे. या नोटीसनुसार यापुढे तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. तर इतर काही संस्था देखील तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढून देऊ शकणार आहेत. यापुढे तुम्हाला आरटीओमध्ये देखील लायसन्स मिळणार आहे. पण आरटीओचा व्याप कमी करण्यात येणार आहे. फक्त गाड्यांच्या आरसीसाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, वैध संस्था, कंपन्या (Companies), एनजीओ (NGOs), ऑटोमोबाईल असोसिएशन (Automobile Associations), वाहन निर्माता संघ ( Vehicle Manufacturers Associations), वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्र ( Vehicle Manufacturers Associations) यांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे. या संस्थांद्वारे तुम्हाला यापुढे लायसन्स मिळणार आहे तुम्हाला लायसन्स हवे असेल तर या संस्थांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार, अर्ज करणाऱ्या संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989नुसार आवश्यक जमीन आणि आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. तसंच त्यांच्या स्थापने नंबर स्वच्छ रेकॉर्ड असणे गरजेचे आहे. या जमिनीवर ट्रॅक बांधावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -