पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अमरिंदर सिंग यांनी तुर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र, काँग्रेसमध्येही राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
‘आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात आहे. हे सहन करण्यापलिकडचे आहे.’ असे सिंग म्हणाले.
बुधवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली.
अमरिंदर सिंग यांनी काही कागदपत्रे डोवाल यांच्याकडे सुपूर्द केली आहेत, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
मात्र, ही कागदपत्रे कशासंदर्भात आहेत हे मात्र, कळू शकले नाही.
पंजाबमध्ये सत्ताबदलानंतर काँग्रेसमधील गृहकलह शांत होईल असे वाटत होते.
मात्र, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री करून प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे पख कापल्याने सिद्धूने राजीनामा दिला आहे.
त्यांच्या समर्थनार्थ मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि अन्य काही सहकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात होते.
मात्र, या शक्यता खोडून काढत आपण काँग्रेसमध्ये राहणार नाही हे नक्की, पण तूर्तास भाजपमध्ये जाणार नाही हेही खरे आहे. असे ते म्हणाले.
अमरिंदर यांना केंद्रीय कृषीमंत्रिपद?
पंजाबमध्ये कृषी कायद्यांवरून भाजपविरोधात वातावरण आहे.
त्यामुळे तो रोष कमी करण्यासाठी अमरिंदर सिंग जर भाजपात दाखल झाले तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे.
त्यांच्याकडे केंद्रीय कृषीमंत्रिपद द्यायचे अशी खेळी भाजप खेळू शकते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरिंदर सिंग हे भाजपच्या फायद्यात पडून शकतात, अशाही चर्चा आहेत.
पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे भाजपचा चेहरा असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते विधानसभा निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. अमरिंदर सिंग – अमित शहा भेट हा त्यामागचा भाग असल्याचे बाोलले जात आहे.
भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येही राहणार नाही ; कॅप्टन अमरिंदर सिंग
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -