Friday, June 21, 2024
Homenewsपत्नीने बहीण, भाऊ आणि शेजाऱ्यांच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह

पत्नीने बहीण, भाऊ आणि शेजाऱ्यांच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह

पतीच्या गुन्हेगारी वृत्तीला कंटाळून पत्नीने आपली बहीण, भाऊ आणि शेजारच्यांच्या मदतीने पतीची हत्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह बाजूच्याच घरात पुरला आणि पती गायब झाल्याची अफवा पसरवली. ही घटना कुर्ल्याच्या क्रांती नगर परिसरात घडली असून दीपक सांगळे ऊर्फ कोत्या भाई असे मृताचे नाव आहे.
माहेरची माणसं आणि शेजारच्यांच्या मदतीने काढला काटा
ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर कुर्ल्याच्या क्रांती नगर मधील घटना आहे. दीपक सांगळे ऊर्फ कोत्या भाई हा क्रांती नगर मधील नामचीन गुंड. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल होते. यामुळे त्याचे कुटुंब तर त्रस्त होतेच. पण, त्याची पत्नी सरस्वती सांगळे आणि तिचे माहेरचेही त्रस्त झाले होते. दोन महिन्यांपूर्वी सरस्वतीने तिची बहीण मनीषा आणि भाऊ आदीत गौतम आणि आनंद यांच्यासह विशाल कारंडे, किशोर साहू आणि रितीक विश्वकर्मा यांच्या मदतीने त्याचा काटा काढायचा ठरवला. एका रात्री त्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले नंतर या सर्वांनी त्याच्यावर वार करुन ठार केले. नंतर त्याचा मृतदेह गोणीत भरून बाजूच्या बंद घरात खोल खड्डा खोदून पुरून टाकला. नंतर तो हरवला आहे म्हणून अफवा पसरवली. याबाबत व्ही बी नगर पोलीस ठाण्यात हरविले असल्याची तक्रारही दाखल केली.मृताच्या बहिणीला संशय आला अन्..
मात्र, याबाबत मृत कोत्या भाईच्या बहिणीला संशय आला होता. तिने पोलिसांना आणि गुन्हे शाखेला याबाबत माहिती दिली. आणि यात घरातलेच कोणी काही केले असावे अशी शंका उपस्थित केली होती. दोन महिन्यानंतर गुन्हे शाखेने कोत्या भाईच्या दोन्ही मेव्हण्यांना गुन्हे शाखा कक्ष 5 ने ताब्यात घेतले आणि त्यांनी या हत्येचा उलगडा केला.
तब्बल दोन महिने बाजूच्याच घरात आपल्या पतीचा मृतदेह पुरून त्याची पत्नी सरस्वती आणि त्याचे नातेवाईक आणि शेजारी काही झालेच नाही अश्या स्थितीमध्ये फिरत होते. मात्र, या हत्येचा उलगडा व्हीबी नगर पोलिसांनी करून सात आरोपीना अटक केली. आज या घरात खड्डा खोदून फॉरेन्सिक(forensic) एक्सपर्ट, डॉक्टर यांच्या मदतीने पालिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे. तीन ते चार तास अथक प्रयत्न करून पोलिसांनी काही प्रमानात कुजलेला हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. एका गुन्हेगाराचा अंत अश्या प्रकारे त्याच्या कुटुंबाने आणि शेजाऱ्यांनी केल्याने या विभागात मात्र खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -